वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील रोटेगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एका जागेसाठी दोन जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या चार जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर रोटेगाव ग्रामपंचायतसाठी मतदान घेण्यात येणार आहे.
येथील केवळ प्रभाग एकमधील सर्वसाधारण जागेसाठी उमेश शिंदे व गणेश शिदि हे दोन जण रिंगणात उतरले आहेत. तर नादी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधील अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा रिक्त राहिली. तर कनकसागज ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमभील अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर सुवर्णा दिगंबर भालेराव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर बजिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेसाठी संदीप शिंद यांनी माघार घेतल्याने ज्ञानेश्वर गोरखा कोळेकर बिनविरोध निवडून आले आहेत.












